Sharad Pawar in SC: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिलं आहे. दरम्यान शरद पवार गटाने या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून ही याचिका दाखल कऱण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने याचिकेच्या माध्यमातून केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्रं दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांच्या याचिकेवर न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी आदेश देऊ नयेत, अशी मागणी करत अजित पवार गटाने यापूर्वी कॅव्हेट दाखल केले होते. 


जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका करताना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केलेल्या निकषांचं उल्लंघन करून निवडणूक आयोगानं हा निकाल दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर दोन्ही गटांच्या नेत्यांचा नियुक्ती अवैध ठरते, तर मग आयोगानं कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव न चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला होता.



शरद पवार गटाला मिळालं नवं नाव


निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ अजित पवार गटाला दिल्यानंतर राज्यात दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरु आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवं नाव दिलं आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला तीन नावांचे पर्याय सादर केले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट हे नाव वापरु शकणार आहे. 


27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणूक होणार असून शरद पवार गटाला नव्या पक्षनावावर उमेदवार उभे करता येतील, असे आयोगाने शरद पवार यांना बुधवारी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.


शरद पवार लेकीसाठी बारामतीत तळ ठोकणार


शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभा मैदानात उतरणार आहेत. शरद पवार सलग 4 दिवस बारामती विधानसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत. तसंच पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा घेणार आढावा घेणार आहेत. 


कसा असेल कार्यक्रम - 


- पहिल्या  दिवशी 15 ला बारामतीत घेणार आढावा बैठक
- दुसऱ्या दिवशी 16 ला दौंड मतदारसंघाची बैठक 
- 17 इंदापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार 
- 18 ला पुरंदरला जाहीर सभा होणार 
- 19 ला पुण्यातएस शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार