मुंबई : होळीसोबतच कोकणात शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हा सण. या सणाला अनेक चाकरमानी मुंबईतून खास आपल्या गावी कोकणात जातात. कामा- धंद्यासाठी आपल्या गावापासून दूर असलेला प्रत्येक चाकरमानी या दिवशी आपल्या देवाच्या पालखीला आवर्जून उपस्थित राहतो. 


रामदास कदम यांनी साजरा केला शिमगा 


इतर चाकरमान्यांप्रमाणे दरवर्षी राज्याचे मंत्री आमदार रामदास कदम यांनी देखील आपल्या गावची भेट घेतली. खेड तालुक्यातील जामगे गावच्या सहाणेसमोर होम लागल्यानंतर ग्रामदेवतेच्या पालखी समोर ते मोठ्या कलेने ढोल वाजवताना दिसले. दरवर्षी रामदास कदम आपल्या कुटुंबियांसोबत गावी जातात. 


माणूस कितीही कामात व्यस्त असला तरीही त्याला हवी असलेली शांतता मिळते ती त्याच्या मातीतच. आणि कोकणात आता सगळीकडेच शिमगोत्सवाचा उत्साह आहे. असं असताना रामदास कदम यांनी आपल्या गावकऱ्यांसोबत हा सण साजरा केला. 


राजकारणात अनेकांचा ढोल ज्यांनी आपल्या कामाने वाजविला त्यांना प्रत्यक्ष ढोल वाजविताना आज अनेकांनी पाहिले