Maharashtra Politics : भाजपनं लोकसभेसाठी महाराष्ट्रात 45 प्लसचं टार्गेट ठेवलंय, त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपला प्रत्येक उमेदवारामागे ताकद लावावी लागणार आहे. त्यासाठी भाजपनं स्वतसह मित्रपक्षांसाठीही फॉर्म्युलाही आखलाय, मात्र भाजपनं ठरवलेला हाच फॉर्म्युलाच शिंदे-भाजपमधील वादाची ठिणगी ठरण्याची शक्यता आहे. भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेसाठी महायुतीतील काही जुन्या चेह-यांना डच्चू देण्यात येण्याची गरज आहे. थोडक्यात जुने चेहरे हटवून नवीन चेहरे देण्यासाठी भाजपचा शिंदे गटावर दबाव असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय.


उमेदवारीवरुन महाभारत घडणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनं मिशन-45 साठी जुन्या चेह-यांऐवजी नवीन चेह-यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्या प्लॅनमुळे महायुतीतील घटक पक्षांच्या जुन्या नेत्यांना फटका बसणार आहे. शिंदे गटातील विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.  मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी 2, मुंबईतील एका जागेवारील उमदेवार बदलण्याची नितांत गरज असल्याचं मत भाजपच्या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले. तर शिवसेनेत उमेदवार निवडीचा अधिकार फक्त मुख्यमंत्री शिंदेंनाच असल्याचं  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 


जुने चेहरे बदलण्याची भाजपची रणनीती


जुने चेहरे बदलण्याची भाजपची रणनीती गुजरात निवडणुकीत यशस्वी ठरली होती. हाच फॉर्म्युला भाजपनं मित्रपक्षांसाठीही तयार केला आहे. यामुळे भाजपच्या फॉर्म्युल्यानुसाराच  मित्रपक्षांनी उमेद्वारा शोधावे लागमार आहेत.  लोकसभेच्या जागांच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे देशातील क्रमांक दोनचं राज्य आहे.. त्यामुळेच महाराष्ट्राबाबत भाजप कोणतीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. मात्र उमेदवार बदलीच्या याच फॉर्म्युल्यामुळे महायुतीतील घटकपक्ष नाराज असल्याची चर्चा आहे.


फॉर्म्युल्यानुसार जुन्या नेत्यांना धक्का बसणार


लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे एकजुटीनं ही निवडणूक लढवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर आहे. या निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युलाही उघड झाल्याची चर्चा आहे. या फॉर्म्युल्यानुसार जुन्या नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पाच ते आठ खासदारांऐवजी नवे चेहरे देणे गरजेचं असल्याचं भाजप श्रेष्ठींचं मत असल्याची माहिती समोर येतेयं. भाजपच्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी 2, तर मुंबईतील एका जागेवारील उमदेवार बदलण्याची नितांत गरज असल्याचं मत भाजपच्या सर्व्हेमध्ये करण्यात आलं.