शिर्डी : शिर्डीतल्या दुहेरी खून खटल्याप्रकरणी १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली... तर १२ जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. २०११ साली शिर्डीत प्रवीण गोंदकर आणि रचित पटणी या शिर्डीतील दोन तरुणांचं खंडणीसाठी अपहरण करुन  खून केल्याचा पाप्या शेखवर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाप्यासह २४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. 


पाप्या शेख या कुख्यात गुंड टोळीतील २४ जणांवर या प्रकरणी मोक्का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात विशेष मोक्का न्यायाधीशांनी दोषींना प्रत्येकी अकरा लाख रुपये दंड ठोठावला असून, यातून जमा होणारे सव्वा कोटी रुपये सरकारकडे जमा केले जाणार आहेत. त्याद्वारे पीडितांच्या पालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.