शिर्डी : साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्यातला वाद चांगलाच पेटला आहे. साई समाधी शताब्दी वर्ष असतानाही शिर्डीच्या विकासासाठी तीन हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात आलेला नाही. याउलट शिर्डी संस्थान शिर्डीबाहेर हा पैसा देत असल्यानं स्थानिक शिर्डीवासीय संतप्त झालेत. 


साई संस्थानच्या बैठकीत जाब विचारण्यासाठी ते गेले असताना त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. तेव्हा ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.