कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : हैदराबाद येथील साई भक्ताने आपला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल ३० वर्षांनी साईबाबांच्या चर्चणी ४० लाख रुपयांचा सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. या मुकूटाचे वजन 742 ग्रॅम असून त्याची किंमत ४० लाख रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैद्राबाद येथील साईभक्त डॉ. रामकृष्णा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी 40 लाख रुपयांचा सुवर्ण मुकट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. यावेळी पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान डॉ. रामकृष्ण यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.


डॉ.रामकृष्ण मांबा यांच्या परिवाराने शुक्रवारी मध्यान आरतीला साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर या परिवाराने चाळीस लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण केला. १९९२ मध्ये डॉ.रामकृष्ण यांच्या पत्नीने साईबाबांना मुकुट दान करण्याचा नवस केला होता. तो नवस आम्ही पूर्ण केला असल्याचं डॉ.रामकृष्ण मांबा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.



हा मुकूट बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागला आहे. हैदराबाद येथील सोनाराने हा मुकूट बनवण्यास मोठी मदत केली आहे. 742 ग्रॅम वजनाच्या या मुकूटाची किंमत ४० लाख रुपये आहे. पत्नीची ईच्छा पूर्ण करताना मला खूप आनंद होत आहे, असे डॉ.रामकृष्ण मांबा यांनी म्हटले आहे.