शिरपूर केमिकल कंपनी स्फोटात १३ ठार, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
शिरपूरजवळ रुमित रसायन बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.
धुळे : शिरपूरजवळ रुमित रसायन बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू तर ३५ जण जखमी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
रसायन कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे शिरपूर शहरासह आजूबाजूची गावे हादरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्यू पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मृतांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. रसायनाची गळती सुरू झाल्यामुळे आसपासच्या भागातल्या लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे.