मनमाड, नाशिक : Shiv Sena Crisis : Aditya Thackeray : शिवसैनिकांनी प्रश्न विचारले असते तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी गद्दारी का केली, याचं उत्तर अगोदर द्यावे, असा घणाघात युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात केला.  हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. आज मनमाड दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार आहे, असे  विधान केले आहे. हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने बनवले गेलेय. हे सरकार कोसळणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. हे थोड्या दिवसांचे आहेत. हे सरकार गद्दारांचे आहे. हे तात्पुरते सरकार आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे आक्रमक झालेत. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांचा चांगलाच समाचार घेतला. सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मांमदमध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांचा उत्साह त्यांनी यावेळी वाढवला.


मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरे यांचे एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरे दिले होते. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली.


आम्ही जी वचने होती ती पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेले नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर करुन दिले. पण स्वत:साठी काहीही आरोप केले जात आहेत, असे आदित्य म्हणाले.



पर्यटन खात्याला कधीही निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकारने पर्यटन खात्याला 1700 कोटी रुपये दिले. मनमाडमध्ये मी आठ कोटी रुपयांचा फंड दिला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.