Shiv Sena Dussehra Rally: शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत खंडपीठासमोर उद्याच सुनावणी होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा (Dussehra Rally)  घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने ही याचिका दाखल केली आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती आरडी धानुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर उद्याच सुनावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आहेत. आता उद्धव ठाकरे गटाने अत्यंत आक्रमक भूमिका घेत एक पोस्टर जारी केले असून आता हिंदुत्व हीच पक्षाची इच्छाशक्ती आणि ताकद असेल, असे म्हटले आहे.


'फसवणूक करणाऱ्यांना माफी नाही'


या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्यावतीने फसवणूक करणाऱ्यांना आता माफी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे. यासोबत पोस्टरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. पोस्टरमध्ये कार्यकर्त्यांना संदेश देत पक्षाने 'चलो शिवतीर्थ' असे लिहिले आहे.


शिवसेना दसरा मेळावा घेणार


यासोबतच दसरा मेळाव्यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने मोठी घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) परवानगी दिली नाही तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानावर पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा आयोजित केला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवाजी पार्कबाबत शिवसेना आक्रमक झाली आहे.


तेजस ठाकरे यांचे होणार लॉन्चिंग?


विशेष म्हणजे या मेळाव्यात उद्धव ठाकरे आपला दुसरा मुलगा तेजस ठाकरे देखील उपस्थित राहू शकतात. पोस्टरमध्ये तेजसचा फोटोही दिसत आहे. यानंतर तेजस राजकीय इनिंगला सुरुवात करु शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. कधीकाळी रंगमंचावर दिसणारा तेजसचा चेहरा यावेळी दहीहंडी उत्सवात खूपच चर्चेत होता.