मुंबई / अमरावती :  Navneet Rana Hanuman Chalisa agitation : खासदार नवनीत राणा मुंबईत येणार असल्याची शिवसैनिकांना कुणकुण लागल्यानंतर विरोधासाठी पूर्ण तयारी करण्यात आली. नवनीत राणा यांचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात जमले होते. मात्र, विदर्भ - एक्सप्रेसने खासदार नवनीत राणा येणार असल्याची शिवसैनिकांना माहिती मिळाली. त्यानंतर महिला शिवसैनिक या मोठ्या संख्येने गोळा होत,  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कूच केली. नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान शिवसेनेला दिले आहे. दरम्यान, नवनीत राणा येणार नसल्याचे कळतात रेल्वे स्थानकातून शिवसेना महिला माघारी फिरल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेनेची फिल्डिंग लावण्यात आली होती. राणा मुंबईत आल्यास त्यांना प्रखर विरोध करणार असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तुम्ही येवून दाखवाच, असा थेट इशारा दिला होता. आज नवनीत राणा येणार असल्याचे वृत्त समजताच सीएसएमटी स्टेशनवर शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. राणा दाम्पत्यांनं मुंबई येऊन दाखवावं, असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.


दरम्यान, मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे इथे यायची कोणी धमकी देत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मातोश्री बाहेरील जमलेल्या शिवसैनिकांनी दिली आहे. मातोश्रीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणखी शिवसैनिक जमा होण्याची शक्यता आहे.


रवी राणा यांना मुंबईला जाऊ देणार नाही!


आम्ही नवनीत राणा आणि रवी राणांना कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा अमरावती शिवसेनेकडून देण्यात आला आहे. रवी राणा यांच्यात हिंमत असेल तर पोलीस सुरक्षेशिवाय त्यांनी जाऊन दाखवाव, असे आव्हान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हणूनमान चालिसा पठण करण्यासाठी आज राणा दाम्पत्य हे मुंबईला जाणार आहे, असे वृत्त धडकले. मात्र यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून आम्ही रवी राणांना कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जाऊ देणार नाही जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक बडनेरा रेल्वे स्टेशनवर जमतील, असा ईशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिला आहे. 


रवी राणा यांच्यात हिंमत असेल तर पोलीस सुरक्षेशिवाय त्यांनी जाऊन दाखवाव. तसेच हनुमान चालीसा पठण करायला आमचा विरोध नाही पण अमरावतीच वातावरण त्यांनी खराब केलं असून आता मुंबईच वातावरण खराब होऊ देणार नाही. कोणत्याहि परिस्थितीत जातीय तेढ निर्माण करण्यासाठी राणांना मुंबईत जाऊ देणार नाही. हिंमत असेल तर रेल्वेन जाऊन दाखवावच असा ईशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिला आहे.