दिनेश दुखंडे , कणकवली : शिवसेनेकडूनही ऑफर आहे. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत जाणार नाहीत, असे नारायण राणे यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र शिवसेनेत येण्याची ऑफर कुणी दिली, हे मात्र सांगण्यास राणेंनी स्पष्ट नकार दिला. २१ सप्टेंबरला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी नारायण राणे भविष्यातली राजकीय दिशा ठरवणार आहेत. पण त्यावेळी त्यांचे खंदे समर्थक म्हणून प्रसिद्ध असणारे कालीदास कोळंबकर त्यांच्यासोबत राहणार का याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्यावर राणेंनी कुणालाही सोबत येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही असं स्पष्ट केलंय.



कोळंबकर यांची दांडी 


नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील शक्तीप्रदर्शनात कालिदास कोळंबकर यांची दांडी मारलीय. राणे यांचे खंदे समर्थक कोलम्बकर गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 


२१ सप्टेंबरलाही मतदारसंघात घटस्थापनेच्या कार्यक्रम असल्यामुळे कोळंबकर राणेंच्या पत्रकार परिषदेला  उपस्थित राहू शकणार नाही , असे झी २४ तासने संपर्क केला असता कोलंबकर यांनी सांगितलंय.


मतदारसंघातील कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे काल शक्तीप्रदर्शनाला उपस्थित राहू शकलो नाही असं कोळंबकरांनी म्हटले आहे.