पुणे : शिवसेनेच्या 'एकला चलो'च्या निर्णयावर भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी टीका केली. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही जोरकस प्रत्युत्तर दिले आहे.


'गणिमी कावा' वापरत 'एकला चलो'चा नारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने आपल्या खास शैलीत 'गणिमी कावा' वापरत 'एकला चलो'चा नारा दिला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भाजपच्या गोटात शिघ्र असंतोष आहे. या असंतोषातेच रूपांतर शिवसेना, भाजपच्या नेत्यांमध्ये 'कोण कोणास म्हणाले?', अशा स्वरूपाचे झाले आहे.


तिखट शब्दांत व्यक्त केली प्रतिक्रिया


शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांचे पाच खासदारही निवडून येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. काकडेंच्या या विधानावर पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना विचारले. या वेळी बोलताना राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.


चार वर्षापूर्वीच भाजपने युती तोडली


प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कोण काकडे? मला माहित नाही. पण, त्यांनी काहीतरी बोलल्याचे ऐकले. ते जे बोलले ते त्यांनी स्वत: विषयी बोललं असेल. त्यानी एकदा आपलं डोकं निट तपासून पहायला हवं. दरम्यान, असा सल्ला देतानाच शिवसेना-भाजप ही युती आता नाही तुटली. भाजपने ती चार वर्षापूर्वीच तोडली होती. त्यामुळे आता तो विषय मागे पडला आहे.


मुख्यमंत्र्यांचे कौतुक, सूच उद्गार


दरम्यान, भाजप आणि काकडेंवर तीव्र शब्दांत टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र कौतुकोद्गार काढले. सध्याचे मुख्यमंत्री हे अत्यंत संयमी, स्थितप्रज्ञ आणि तितकेच प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार पाच वर्षे टिकेल अशी भविष्यवाणी करायलाही राऊत विसरले नाहीत.