अलिबाग : रायगडच्या  शिवसेना जिल्हाप्रमुखांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी आपला हा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. देसाई हे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात उद्योग असूनही शिवसैनिक उपेक्षित असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय. अचानक दिलेल्या राजीनाम्याने शिवसेनेत खळबळ उडाली असून जिल्ह्यात उद्योग असूनही शिवसैनिक उपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.


देसाई हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्ह्यात बेरोजगारी वाढली आहे. अनेक मोठमोठे उद्योग असतानाही शिवसैनिक उपेक्षित असल्याची भावना प्रकाश देसाई यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे ते अनंत गीते यांच्यावर ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. देसाई यांनी आपला राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. गेली तीन वर्षे देसाई रायगड जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत होते. यापुढे मात्र शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितले.