अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कुटुंबाचा आधार तुटला आहे आणि ते दुखी असून त्यांची लहान मुले आईचं सांत्वन करत आहेत. या पीडित कुटुंबाला न्याय हवा आहे. 


शिवसेनेनेन या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचे ठरवलंय.  हत्या झालेल्या वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी बातचीत केली असता,  आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.



शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी