वाल्मिकी जोशी, झी मीडिया, जळगाव : अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्डिडिओंमुळे शिवसेना पक्ष गोत्यात येण्याचे किस्से देखील पुढे येतात. अनेकदा एखाद्या कार्यक्रमानिमित्त काही  उधळपट्टी करताना चे व्डिडिओ समोर येतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये उधळपट्टी झालेली दिसत आहे. (shiv sena workers video of blowing money on gulabrao patil birthday went viral on social media nz)



हे ही वाचा - सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव मध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. जल्लोष साजरा करताना कार्यकर्त्यांकडून गुलाबराव वाघ यांच्यावर पैसे उडवले गेले. पैसे उडवल्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन सभेच्या दिवशीच हा सदर प्रकार घडला. 


 



हे ही वाचा - आदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर



एकीकडे शिवसेना नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी दमदार प्रयत्न करण्याची गरज आहे पण एका जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मात्र उधळपट्टी केली जात आहे. हा प्रकार उघड झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.