उदयनराजे भोसलेंवर दु:खाचा डोंगर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 व्या वंशजांचं निधन
पुण्यातील जहांगीर रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वंशज शिवाजीराजे भोसले यांचं वृद्धपकालाने निधन झालं आहे. पुण्यातील जहांगीर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र उपचारादरम्यान वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणलं जाणार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे यांची शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख होती. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचं नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली.
दरम्यान, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. ज्यावेळी उदयनराजे आणि शिंवेद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेल्यावर त्यांनी वडिलकीच्या नात्यानं अनेकवेळा दोघांचं मनोमिलन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजघराण्यावर आणि साताऱ्यामध्ये शोककळा पसरली आहे.