हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) पंतप्रधान करण्यासाठी 2009 ला सेना-राष्ट्रवादीची युती होणार होती. त्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला. 2009 चा डाव मात्र 2019 ला झाला असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी लांडेवाडी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझी हकालपट्टी झाली. मी काय गुन्हा केला होता. मी शिवसैनिकांच्या जोरावर निवडून आलो. एक अभिनंदनाची पोस्ट केली म्हणून माझी हकालपट्टी केली गेली. मी माघार घेतली मात्र पुण्यातून लढा म्हणतात हा कुठला न्याय, ज्यांनी आमचं आयुष्य संपवल त्या राष्ट्रवादीसोबत का मिळत जुळत घ्यायचं? असाही प्रश यावेळी आढळराव यांनी केला


शिवाजी आढळराव यांनी आज दुपारी लांडेवाडी इथल्या शिवनेरी निवासस्थान इथं कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला.आपल्यावर शिवसेनेने अन्याय केला असून मनाला खूप वेदना झाल्याचे सांगत 18 वर्ष प्रामाणिक राहून माझी आधी हकालपट्टी केली आणि मग सारवासारव केली हे पटलं नाही मनाने शिवसेने सोबत असून सोबत मात्र एकनाथ शिंदेच्या आहे असं त्यांनी म्हटलंय.


उद्धव ठाकरे यांनी मला मुंबईला बोलावून मीटिंग मध्ये जखमेवर मीठ चोळलं. संजय राऊत यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढण्याचं सांगितलं. राष्ट्रवादी सोबत जुळवून घ्या अस सांगितलं पण ज्या पक्षासोबत एकहाती लढा दिला त्यांच्या सोबत जुळवून कसं घेणार? असाही पूनरुच्चार केला


राष्टवादीने शिवसेनेला संपवण्याचं काम केलं
शिवसेनेला सातत्याने राष्ट्रवादीने संपवायचाचं प्रयत्न केला. 2004 ते 2022 या कालावधीत मला राष्ट्रवादी कडून खूप त्रास झाला. तरीही एकाकी लढा दिला राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून ठेवली होती असाही आरोप यावेळी आढळराव यांनी केला


सरकार मध्ये असूनही गेली अडीच वर्ष राष्ट्रवादीने त्रास दिला. न्याय मिळाला नाही. खेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने दहशतीच्या जोरावर त्रास दिला. मुख्यमंत्री आमचा मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यानी सेनेच्या लोकांना जेलमध्ये टाकलं. दिवसाआड त्यांचं कुटुंबीय माझ्याकडे यायचे मात्र न्याय मिळाला नाही. न्याय आणि विधी खात आमच्या मुख्यमंत्र्यांकडे असूनही न्याय मिळाला नाही असा उद्वेग आढळराव यानी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.