रायगड : राज्यासह देशभरात आज शिवजयंतीचा (ShivJayanti 2021) उत्साह पाहायला मिळतो. शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जातेय. दरम्यान किल्ले रायगडावरुन एक बातमी समोर येतेय. रायगडावर दारू पिऊन आलेल्या काही पर्यटकांना शिवप्रेमींनी चोप दिलाय. कोल्हापूर पाठोपाठ रायगडावर अशी घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरात शिवजयंतीची लगबग सुरु असताना रायगडावर काही तरुण तरुणी रायगडावर दारु पिऊन आलेले दिसले. पिवळ्या सदऱ्यातले तरुण दारू पिऊन गडावर आल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे असलेल्या शिवप्रेमी आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाली. आणि शिवप्रेमींनी त्या तरुणांना चोप दिली. त्या तरुणांनी माफी मागत असतानाही मारहाण सुरूच होती असेही सांगितलं जातंय.


झेंड्यासाठी वापरतात त्या काठीनं त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. 



शिवजयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवरायांना अभिवादन केलं. मुंबईत शिवाजी पार्क इथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपालांनी हार अर्पण करत अभिवादन केलं. 


शिवरायांच्या स्वप्नातला देश साकार व्हावा अशी प्रार्थना राज्यपालांनी केली. राज्यपालांसह शिवाजी पार्कवर महापौर किशोरी पेडणेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.