अहमदनगर : श्रीपाद छिंदम याने अहमदनगरचे महापौर, मनपा आयुक्त आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवलं आहे, यात, 'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनावधनाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे माफी मागतो आणि प्रायश्चित्तास तयार आहे', असं पत्र पाठवलं आहे.


पत्रात छिंदम नेमकं काय म्हणाला?


मी केलेले वक्तव्य हे निश्चितच माफीलायक नाही- छिंदम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीपाद छिंदम याने पत्रात असं म्हटलं आहे. 'महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनावधनाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यामुळे सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मी केलेले वक्तव्य हे निश्चितच माफीलायक नाही. तीरीही मी सर्व जनतेची हात जोडून माफी मागतो आहे. यासाठी मला जे प्रायश्चित्त करावे लागेल, त्यास मी तयार आहे व केलेल्या वक्तव्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी अहमदनगर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा राजीनामा देत आहे.'


काय आहे श्रीपाद छिंदम प्रकरण?


एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदमने फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. अहमदनगरचे निलंबित भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदमची ही कथित क्लिप समोर आली आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली.