शिवराय ते भीमराय सदभावना रॅली दलित-मराठा
भीमा कोरेगाव घटनेनंतर सर्वात अगोदर तीव्र पडसाद उमटणाऱ्या औरंगाबादेमध्ये सदभावना रॅली काढण्यात आली.
औरंगाबाद : भीमा कोरेगाव घटनेनंतर सर्वात अगोदर तीव्र पडसाद उमटणाऱ्या औरंगाबादेमध्ये सदभावना रॅली काढण्यात आली.
मराठा, दलित, मुस्लीम, ओबीसी एकत्र
शिवराय ते भीमराय सदभावना रॅलीमध्ये मराठा, दलित, मुस्लीम, ओबीसी समाजासह विविध पुरोगामी, डाव्या चळवळीतील लोक सहभागी झाले होते.
बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ समारोप
शहरातील क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरु झालेल्या या रॅलीचा भडकल गेट इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समारोप करण्यात आला. या सदभावना मूक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.