Maharashtra Kesari Kusti Won Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) महेंद्र गायकवाडवर (Mahendra Gaikwad) मात करत चांदीची गदा उंचावली आहे. शिवराजने महेंद्र गायकवाडचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. या विजेतेपदानंतर आता शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe) महिंद्रा थार जीप व रोख रक्कम पाच लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari final) फायनल सामन्यात शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडमध्ये अंतिम लढत झाली. हा सामना सुरु होण्याच्या काही मिनिटातच शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe)  महेंद्र गायकवाडला मैदानात चीतपट करत विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात मोठी अटीतटीची लढत होईल अशी कुस्तीप्रेमींची अपेक्षा होती.मात्र सामना सुरु होण्याच्या अवघ्या 2 मिनिटाच्या आतच शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत चीतपट करून महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. या विजयानंतर त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला. 


शिवराज याचे वडिल शेती करतात.शेतीसोबत दुधाचा जोड व्यवसाय आहे. शिवराजला आजोबापासून कुस्तीचा वारसा आहे. आजोबा आणि वडील दोघे पैलवान आहे. त्यांचाच वारसा आज पुढे चालवत महाराष्ट्र केसरी खिताबावर नाव कोरलं आहे.