कोल्हापूर :  कोल्हापूरमध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याचे जाहीर करुन बराच काळ लोटलाय. विमानतळ सुरू होण्याची नागरिकांनी वाट पाहिली पण ते काही सुरू होत नाहीयं. या सर्वाला कंटाळलेल्या शिवसैनिकांनी विमानतळावर एक वेगळंच आंदोलन केलंय. या आंदोलनाचीच चर्चा सध्या सगळीकडे आहे.


शिवसैनिक संतापले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांकडून वारंवार विचारणा झाली, पत्र व्यवहारही करण्यात आला. या सर्वाला प्रशासनाकडून काहीच दाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय.


या सर्वाला  संतापलेल्या शिवसैनिकांनी विमानतळाची जागा योग्य नसल्यामुळे विमान सेवा सुरू व्हायला अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत विमानतळाच्या जागेवर होम हवन केलं. 


मांत्रिकाला बोलावलं


संतापलेले शिवसैनिक एवढ्यावरचं थांबले नाहीत. त्यांनी प्रतिकात्मक मांत्रिकाला बोलावून 'या जागेवर काही भूत पिशाच आहे का ?' हे पहायला सांगितले.


कोल्हापूर- मुंबई; कोल्हापूर -हैदराबाद कोल्हापूर बेंगलोर या सेवा यापूर्वीच सुरू होणार होत्या. 


आयत्या वेळेला या सेवा सुरू होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं.


त्यामुळेच प्रवाशांच्या मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामूळेच शिवसैनिकांनी आज हे अभिनव आंदोलन केलं.