कल्याण पश्चिम मतदारसंघावर अखेर शिवसेनेचा भगवा
पश्चिम विधानसभा मतदारसंघावर अखेर शिवसेनेचा भगवा
कल्याण : निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून चर्चेमध्ये राहिलेल्या आणि अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर इथून वीस हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला आपण अधिकाधिक न्याय देऊ आणि मतदारसंघातल्या प्रमूख समस्यांबरोबरच पत्रीपुलासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू असा विश्वास यावेळी विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.
आधी भाजपच्या वाट्याला आलेली कल्याण पश्चिमची जागी शिवसेनेत्या तीव्र मागणीमुळे शिवसेनेसाठी सोडण्यात आली. पण यामुळे नाराज विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत येथून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही जागा कोण जिंकणार याबाबत उत्सूकता होते.
शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेच्या स्टार प्रचारकांनी त्यांच्यासाठी प्रचार केला. विश्वनाथ भोईर यांना 65486 मते मिळाली. तर नरेंद्र पवार यांना 43209 मते मिळाली. तर मनसेच्या प्रकाश भोईर यांना 38075 मते मिळाली.