मुंबई : नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटवर आता शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. राज्यातील बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या ट्विटला उत्तर दिले आहे. शिवसेना कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही आणि घाबरणार नाही असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. (Eknath Shinde Answer to Narayan Rane)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज नारायण राणे यांनी मातोश्रीच्या चौघांवर इडीकडून नोटीस तयार असल्याचं ट्विट केलं होतं. नारायण राणे हे उद्या पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्य़ाचा दावा देखील केला जात आहे. त्यामुळे आता राणे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर ट्विट केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या असून अॅक्शनवर रिअॅक्शन येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.


दरम्यान आज नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर मुंबई महापालिकेचे अधिकारी पोहोचले होते. सकाळी त्यांनी नोटीस देण्यात आली होती. अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांकडून मोजमाप केले जात आहे. त्यामुळे राणेच्या बंगल्यावर कारवाई होणार का याकडे देखील लक्ष लागलं आहे.