नाशिक : साने गुरुजींच कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत पैठणी तसेच पैसे वाटपामुळे अधिकच चर्चेत आलीय. आता या निवडणुकीत आमदार नरेंद्र दराडेच शिवीगाळ करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय.  त्यांच्या उपस्थितीत शिक्षक कार्यकर्त्यांनी मारामाऱ्या करत एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. नाशिकच्या बी डी भालेकर शाळेजवळील केंद्राजवळ हा प्रकार घडला. यात कुठलीही पोलीस तक्रार दाखल झाली नाहीये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पुढील पिढी घडविण्याच्या उदात्त कार्य करणाऱ्या शिक्षकांना आमदार  प्रतिनिधी निवडताना आलेल्या राजकारणाचे पडसाद आता शिक्षण क्षेत्रात उमटू लागले आहेत. दरम्यान आपण कोणतीही शिवीगाळ केली नसल्याची प्रतिक्रिया आमदार नरेंद्र दराडे यांनी केलं आहे.