....तर रामटेक बंगला मला द्या, संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं; मग पंकजा मुंडे आणि बावनकुळेंचं काय?
गेल्या अनेक दिवसांपासून रामटेक बंगल्याची भलतीच चर्चा आहे. पंकजा मुंडे की बावनकुळे कुणाला हा बंगला मिळणार हे अजून ठरलेलं नाही
गेल्या अनेक दिवसांपासून रामटेक बंगल्याची भलतीच चर्चा आहे. पंकजा मुंडे की बावनकुळे कुणाला हा बंगला मिळणार हे अजून ठरलेलं नाही. त्यात बंगला अपशकुनी असल्याचा समज असल्याने मंत्री धास्तावलेले आहेत. त्यातच आता रामटेकसाठी संजय शिरसाट स्व:ता समोर आले आहेत. रामटेक बंगल्यावरून काय घडोमोडी घडतात...पाहुयात हा रिपोर्ट..
रामटेक बंगला कोणत्या पंकजा मुंडेंना मिळणार की चंद्रशेखर बावनकुळेंना हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बंगल्याबाबत अनेक दंतकथा असल्यानं अनेक मंत्री हा बंगला स्वीकारण्यास उत्सुक नाहीत. त्यातच रामटेक बंगला देताना सामान्य प्रशासन विभागानं घोळ घातला होता. सुरुवातीला हा बंगला चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता. नंतर रामटेक बंगला पंकजा मुंडेंना देण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही मंत्र्यांपैकी कुणीही बंगल्याचा अजून ताबा घेतलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी हा बंगला पंकजा मुंडेंनी मागितल्यानं त्यांना दिल्याचं सांगितलं आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले आहेत. आणि ज्या मंत्र्यांना बंगले मिळालेत त्यांना बंगले नकोयेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या निमित्तानं त्यांच्या मनातली बंगल्याची इच्छा बोलून दाखवली. कुणाला रामटेक बंगला अपशकुनी वाटत असेल तर आपण तिथं जायला तयार असल्याचं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे.
रामटेक बंगल्यात जो मंत्री राहायला गेला त्याच्यावर आरोप होतात. त्याचं राजकीय भवितव्य धोक्यात येतं अशी दंतकथा आहे. राजकीय वर्तुळात रामटेकविषयी एवढी भीती दाखवली जात असतानाही शिवसेनेचे मंत्री तरीही रामटेक बंगल्यात राहायला जाण्यास तयार आहेत.यावरुन शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मनात बंगल्याविषयी किती खदखद आहे हे अधोरेखित होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.