औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( raj  यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महत्वाच्या घोषणा केल्या. 1 मे रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये जाहीर सभा आणि 5 जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार असा या दोन घोषणा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या या घोषणेवर औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. हिंदुहृदयसम्राट ही शिवसेनाप्रमुख यांना मिळालेली उपाधी आहे. ती दुसऱ्या कोणाच्याही नावावर होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. 


राज ठाकरे यांना औरंगाबादमध्ये यायचे आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोणी कुठलीही आणि कशीही सभा घेतली तरी काहीही फरक पडणार नाही. सभा घ्यायची आहे तर त्यांचे स्वागत आहे असे त्यांनी सांगितले.


मनसे कार्यकर्त्यांना घेऊन राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. चांगली गोष्ट आहे. पण, 'पहिले मंदिर फिर सरकार' ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे याचाही विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे, पण तुमचं काय? असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.


दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कुणी कुठेही सभा घेतली तराई बाळासाहेब ठरे यांचा रेकॉर्ड तोडू शकत नाही. औरंगाबाद येथे मनसेची काहीच ताकद नाही. त्यामुळे सभेला यश येणार नाही असं म्हटलंय.