भीमा कोरेगाव प्रकरणावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत.
मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. समाजकंटकांनी घातलेल्या या राड्यात काहीजण जखमी झाले आहेत तर एका तरुणाचा मृत्यू झालाय. तसेच ३० ते ४० वाहनांचं नुकसान झालय. भीमा कोरेगावच्या ऎतिहासिक लढाईच्या द्विशतक पूर्तीनमित्त इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय तिथे जमला होता. या पार्श्वभूमिवर नगर रोड परिसरात हा राडा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.