Sanjay Raut Bail: शिवसेनेचे मुलखमैदानी तोफ, ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि ठाकरेंचा आवाज असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) मागील 3 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊतांना अटक केली होती. मात्र, अखेर 103 दिवसांनंतर राऊतांचा जामीन मंजूर (Sanjay Raut Bail) झाला आणि राऊत कारागृहातून बाहेर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून राऊत देखील भावूक झाले. त्यावेळी हात जाडून त्यांनी कार्यकर्त्यांचा प्रणाम केला. मात्र, राऊत यावेळी देखील विरोधकांना इशारा देणं चुकले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडुप येथील घराजवळ शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. आपल्या घराजवळ कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊतांनी पुन्हा नव्या जोमात गर्जना केली आहे. त्यावेळी त्यांनी भाजपला शिंगावर घेत थेट इशारा दिलाय.


काय म्हणाले Sanjay Raut?


मी आता घरी आलोय. माझ्या सुटकेनं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं दिसतंय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक कसा असतो, हे आज महाराष्ट्राने पाहिलं, असं राऊत म्हणाले. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही मी सांगितलं होतं की, मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही, अशी आठवण देखील राऊतांनी यावेळी करून दिली.


दरम्यान, मागील चार महिन्यांपासून शिवसेना (Shiv Sena) उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र शिवसेना तुटली नाही.आपली शिवसेना बुलंद आहे. अंधेरीच्या निवडणुकीने दाखवून दिलंय, शिवसेनेची मशाल पेटली आहे. आता त्यांना कळेल, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना (Sanjay Raut) अटक केली, असं म्हणत संजय राऊतांनी डरकाळी फोडली.


आणखी वाचा - गजा मारणेला जामीन झाला होता, पण नंतर अटक झालीच होती, मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया!


दरम्यान, मी भगव्याबरोबर जन्माला आलो आणि भगव्याबरोबरच जाईल, असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं आहे. मला तुम्ही 103 दिवस कारागृहात ठेवलं, आता मी 103 आमदार निवडून आणणार, असं वक्तव्य करताच कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. त्यामुळे आता संजय राऊत 2.0 हे प्रकरण सुरू झालंय की काय? , असा सवाल आता विचारला जातोय.