नाशिक: निधी घोटाळ्यातील आरोपी अंतरिम जामीनावर सुटलेला आहे. देशाचं स्वाभिमान असलेली विक्रांत युद्धनौका (INS Vikrant) वाचवण्याच्या नावाखाली या लोकांनी 58 कोटी रुपये गोळा केले. यात घोटाळा झाल्याचं राजभवनाने मान्य केलं आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही पैसे गोळा केले, राजभवनात जमा केले नाहीत, पैसे परस्पर भाजपाच्या (BJP) तिजोरीत गोळा केल्याचा दावा आरोपी करतायत, आणि ते जे आरोप करतायत त्यावर तुम्ही प्रश्न विचारताय असा सवालही राऊत यांनी पत्रकारांना विचारला.


उद्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसला आहे आणि तिकडून तो दहशतवाद वाढला आहे म्हणून चिंता व्यक्त करतोय, असाच हा प्रकार असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. 


विक्रांत घोटाळ्यातील आरोपी जे आरोप करतायत ते स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी करत आहेत. कोर्टाने जरी अंतरिम जामीन दिला असला तरी भविष्यात या सर्वांना तुरुंगात जावं लागणार आहे असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. 


विक्रांत घोटाळ्याचे स्पष्ट पुरावे आहेत. हायकोर्टात जाऊन तुम्ही दिलासा घोटाळ्यातील एक लाभार्थी ठरलात, म्हणून निर्दोषत्व सिद्ध होत नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


मी त्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढला आहे, हा फक्त ट्रेलर आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी मीरा भाईंदर महापालिकेचा निधी आणि त्यातून केलेला घोटाळा त्याचे कागदपत्रा देऊ शकतो. त्यासंबंधी तक्रार दाखल होणार आहे असा दावाही संजय राऊत यांनी केला.