भाजपचे पानिपत, शिवसेना-राष्ट्रवादीची अंबरनाथमध्ये मुसंडी
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका पंचायत समितीतील भाजपची सत्ता शिवसेना-राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणली आहे.
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका पंचायत समितीतील भाजपची सत्ता शिवसेना-राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणली आहे.
अंबरनाथ पंचायत समिती आता शिवसेना -राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात आली आहे. एकूण आठ जागांपैकी ६ जागांवर विजय मिळवत ही पंचायत समिती ताब्यात घेतली.
जिल्हा परिषदेत शिवसेनेची आघाडी
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला मागे टाकत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेनं ७, भाजपनं २ तर 2 काँग्रेस आणि अपक्ष एका जागी विजयी झालेत.
फेर निवडणूक होणार
दरम्यान, ३८ शेलार गण मतदार यादीतील घोळ आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याठिकाणी मतमोजणी होणार नाही. तसंच त्याठिकाणी फेर निवडणूक होणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ५ठिकाणी मतमोजणी होतेय. त्यासाठी साडे पाच हजार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना निवडणुकीत रंगलाय.