रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेतर्फे अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या २४ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेना खासदारांसह २४ तारखेला अयोध्या दौरा ठरला होता. याच दौऱ्यात उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांची भेट घेणार होते. पण काही महत्त्वाच्या कारणांमुळे ही भेट देखील पुढे गेली आहे. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या बैठका जोरात सुरु आहेत.


आघाडीचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास तयार असले तरी दिल्लीतून याला अजून हिरवा कंदील येत नाही. काँग्रेसकडून महाशिवआघाडीला अद्याप हिरवा कंदील नसल्यामुळे ही भेट लांबणीवर गेली आहे. सरकार स्थापनेसाठी वेळ लागणार असल्याने हा दौरा पुढे ढकलला.