Uddhav Thackeray on BJP: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला बळ मिळालं असून, आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रात महायुतीला कडवं आव्हान दिलं. उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांच्या बैठकीत याचा उल्लेख करताना असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) घाम फोडला असं विधान केलं आहे. मुंबईत शाखा प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपावर हल्लाबोल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"लढाईला तोंड फुटत आहे. हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजपा म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते. 10 वर्षं काय अंडी उबवली," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


"आयुष्यातील हे सर्वात मोठे आव्हान. यानंतर आव्हान देणारा कुणी उरला नाही. शिवसेनेची तळपती तलवार आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत," अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही. आलात तर तोडून टाकू. 
हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. एवढे खाताय ते जातंय कुठे. खायला काही मर्यादा आहे की नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


"धनाढ्य व चो-यामा-या करणारे दुबार मतनोंदणी करत आहेत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का ? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उप-यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात, पहिले कानफाट फोडा .गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 


कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. सगळीकडे पाणी तुंबत आहे. हे विकासपुरूष आहेत. आरेचा भूखंड मुंबई बँकेला देतायत. त्यांचा भ्रष्टाचारी तिथे बसलाय ना. 
फनेल झोनमध्ये सध्या हवेतला टीडीआर काढतायत. अदानी माझा लाडला सुरू आहे. मुंबईच्या अस्तिवाची लढाई आहे. मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत आलेच पाहिजेत. राहिलेली गुर्मीही काढू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 


बीएमसीच्या 90 हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिलेत ते सांगत नाहीत. एमएमआरडीएला बीएमसीतून पैसा का ? बीएमसीला भिखेला लावतायत. आमची सत्ता आल्यावर एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू. महापालिका आहे इथं, सगळे गुजरातला...आपणही जावून राहू मग गुजरातला. या लोकांना गाडू ही शपथ घेवून निघा. प्रवाह उलटा फिरवणारा नेता असतो. ती ताकद आपल्यात आहे. घराघरात जाऊन मतदार यादी तपासा. गटप्रमुखांवर मोठी जबाबदारी. प्रत्येक यादीत आघाडी मिळवून द्या असं ते म्हणाले. 


चिन्हाचा निकाल लागेल. पण पाच पंचवीस वर्षे लागतील. शिवसेना हे नाव मला मिळणार याचा विश्वास आहे. ग्रामीण भागात चोर कंपन्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावून सेनेचा धनुष्यबाण सांगितले. मशालीशी साधर्म्य असणारी चिन्हे ठेवू नका अशी विनंती केली आहे. त्याचाही निकाल पाच पंचवीस वर्षे लागतील. मुस्लिम ख्रिश्चन आता सोबत आलेत असंही त्यांनी सांगितलं. अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. तू तर राहीन नाहीतर मी तर राहीन असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला. हात उगारला त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही, आदेश पाहिजे तर आदेश देतो असंही ते म्हणाले.