मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरा भाईंदरमध्ये याआधी भाजप शिवसेनेची सत्ता होती. पण निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवल्या. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीही झाली नाही. तरीही खरी लढत ही शिवसेना भाजप यांच्यात पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनीही मिरा भाईंदरमध्ये सभा घेतल्या.  


शिवसेना इथे निवडणुकीआधी विजयाचा विश्वास बाळगत होती. शिवसेनेचं संख्याबळ ६ नं वाढलं असलं तरी एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळालंय. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. 


आमदार प्रताप सरनाईकांनी आयाराम गायरामांवर केलेल्या तिकीटांच्या खैरातीमुळे निष्ठावंत नाराज झाले होते. तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर ज्येष्ठ नेते प्रचाराच्या सुरूवातीच्या काळात कुठेच दिसले नाहीत. त्याचाही मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांनी देश पादाक्रांत केला होता. त्यामुळे शिवसेना यापुढेही स्वबळावर लढणार असल्याची प्रतिक्रिया परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी दिली.