कोल्हापूर : बाजारपेठेतले साखरेचे दर उतरल्याचं कारण देत राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी 'एफआरपी'ची (fare and remunrative price अर्थात योग्य आणि लाभकारी मूल्य) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायला टाळाटाळ सुरु केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच संतापलाय. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या शिवसैनिकांनी कोल्हापूर साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा काढलाय. 'एफआरपी'ची रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी केली.


'एफआरपी'ची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांवर तात्काळ कारवाईची मागणीही करण्यात आली.


यावेळी शिवसैनिकांनी आपल्यासोबत आणलेल्या मशाली साखर उपसंचालकांना देत आपल निषेध नोंदवला. 


येत्या काही दिवसांत 'एफआरपी'ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही, तर शिवसेना स्टाईलनं धडा शिकवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.