मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतल्या भ्रष्टाचाराचे एकेक नवनवे प्रकार दररोज उघडकीस येतायत. बँकेमध्ये २१ हजार ४९ खाती बनावट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीये. या बँकांचे केवायसी करण्यात आलेलं नाही. केवळ एक्सेल शिटमध्ये या खात्यांची माहिती ठेवण्यात आली आहे. २०१७ पासून हा प्रकार सुरू असून बँकेतल्या केवळ ६ जणांनाच याची माहिती होती, असं आता उघड झालं आहे. ऑडिटर, ऑडिट कमिटी एवढंच नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळापासूनही ही बाब दडपण्यात आली होती हे विशेष.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी यावेळी कऱण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेश वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरीयमसिंग यांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.