काय चाललंय हे? नाशिक शहरात होताहेत धक्कादायक मृत्यू
नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे धक्कादायक मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : राज्यासह नाशिक शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना, आता वेगळ्याच बातमीने नाशिककरांची चिंता वाढली आहे. नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे धक्कादायक मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
कोरोना संसर्गामुळे आधीच आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असताना, नाशिकमध्ये अचानक वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे.
नाशिकमध्ये गेल्या 24 तासात श्वास घेण्यास त्रास झाल्याने चक्कर येऊन रस्त्यात मृत्यू झाले आहेत. अनेकजणांचा घरातच मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासात चक्कर येऊन 9 जण दगावल्याची पोलिसांच्या अहवालात नोंद झाली आहे.
गेल्या महिनाभरात जवळजवळ पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने कोरोना बाधितांच्या मृत्यूतही वाढ होत आहे.
आरोग्य आणिबाणीच्या परिस्थितीत नाशिककरांनी अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे.