Shocking Pune Grip Strength Check Reel Video: सोशल मीडियावर अल्पवधीत प्रसिद्ध होण्याचं सध्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणून तरुणाई रिल्सकडे पाहते. मात्र या सवंग प्रसिद्ध आणि रिल्सच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याचं चित्र मागील काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. जगभरातील हा विचित्र ट्रेण्ड आता महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यात रिल्सच्या नादात तरुणाने केलेली वेगवेगळी स्टंटबाजी आणि त्यामध्ये अगदी जीवावर बेततील असे प्रकार केल्याचं समोर आल्यानंतर पुण्यातून पुन्हा एकदा असाच धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


काय आहे या व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एका तरुण-तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुणे-बंगळुरु महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवर शूट करण्यात आला आहे. या पडीक अवस्थेमधील इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी संस्टबाजी करताना दिसत आहेत. ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे हे तपासून पाहण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याची कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. दोन ते तीन मजल्यांइतक्या उंचीवरुन ही तरुणी तरुणाचा हात पकडून अधांतरी लटकत असल्याचं दिसत आहे.


पुण्याकडून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर चढून ही स्टंटबाजी करण्यात आली आहे. हा परिसर स्वामी नारायण मंदिराजवळच आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांबरोबर त्यांचा हा स्टंट शूट करणारा एक तरुणीही व्हिडीओत दिसत आहे. पूर्ण तयारीने हे तिघे इमारतीवर चढले होते, असं दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवरुन तरुण-तरुणीवर टीका केली आहे.


नक्की वाचा >> पुणे: टॉवेल ठेवताना लागला शॉक; आई-वडीलांसह 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू


पोलीस कारवाई करणार का?


हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याबद्दलची माहिती मिळालेली नाही. मात्र आता तो व्हायरल झाल्याने पुणे पोलीस याचा दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून सदर तरुण-तरुणीवर कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 



काही दिवसांपूर्वीच दरीत कार पडून एका तरुणीचा मृत्यू


काही दिवसांपूर्वीच संभाजीनगरमध्ये दरीपासून काही अंतरावर कारमध्ये रील शूट करण्याच्या नादात मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीने रिल शूट करण्याच्या नादात ब्रेकऐवजी एस्केलेटर दाबल्याने कार रिव्हर्स जाऊन दरीत पडली होती. या अपघातामध्ये तरुणीचा जीव गमावावा लागला होता. दरम्यान, त्याआधी पुण्यातील एका तरुणीने दुचाकीवर बसून केलेला जीवघेणा स्टंटही व्हायरल झालेला.