Virar News : अनेक पालक मुलांना एकटं घरात ठेवून बाहरे जातात. मात्र, हे फक्त धोक्याचेच नाही तर मुलांसाठी जीवगेणे देखील ठरु शकते. कारण, विरारमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.  विरारमध्ये चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार मध्ये चौथ्या मजल्यावरील बेडरुमच्या खिडकीतून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दर्शनी शालियान असं या मृत बालिकेचे नाव आहे. एकुलत्या एक मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या आई वडिलांनी तिचे डोळे दान करायचा निर्णय घेतला आहे.


नेमकं काय घडलं?


विरार पश्चिमेकडे बच्चराज ही 19 मजल्यांची इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शालियान कुटुंब भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहेत. वडील मुंबईला कामाला जात असल्याने आईने दर्शनीला घरात एकटीच झोपेत घरी सोडून वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडायला गेली होती. घरात झोपलेल्या दर्शनीला याच दरम्यान जाग आल्याने तिने आपल्या आईला रूममध्ये पाहिले. मात्र, आपली आई दिसत नसल्याने तिने बेडरूममधील बेडवर उभे राहून खिडकीतून इमारतीच्या खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. खाली वाकून पहाताना या चिमुकलीचा तोल गेला आणि ती थेट चौथ्या मजल्यावरून खाली पडली. यात दर्शनी हिचा जागीच मृत्यू झाला आहे.


एकुलत्या एका मुलीचा मृत्यू


कुटुंबातील चिमुकलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे. आपल्या मुलीचा असा अचानक अपघाती मृत्यू झाला व इतका मोठा दुःखाचा डोंगर आपल्यावर असताना देखील शालियन दांपत्याने एक धाडसी निर्णय घेतला. चार वर्षाच्या मृत चिमुकली दर्शनीचे डोळे तिच्या आई- वडिलांनी दान केले आहेत. मृत चिमुकली दर्शनीच्या आई-वडिलांनी तिचे डोळे दान करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्रच कौतुक होतं आहे.