Pune Crime : WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime : हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून तरुणाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून पुण्यात एकाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच आता व्हॉट्सअॅप ग्रुपमधून (Whats App Group) काढून टाकल्याने एका ग्रुप अॅडमिनला (Whats App Admim) बेदम मारहाण करत त्याची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
पुण्यातील फुरसुंगीत (Fursungi) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह (Remove) केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत या टोळक्याने अॅडमिनची जीभच कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला आहे.
तक्रारदार - आरोपी एकाच सोसायटीतील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्य आणि आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अॅडमिन होते. दरम्यान, त्यांनी या ग्रुपमधून सोसायटीतील एका व्यक्तीला रिमूव्ह केलं. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी रिमूव्ह का केले असा मॅसेज तक्रारदारांच्या पतीला व्हॉट्सअपला टाकून विचारणा केली. पण, त्यालाही तक्रारदार यांच्या पतीने उत्तर दिलं नाही.
अॅडमिनाल बेदम मारहाण
त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले. तक्रारदार आणि त्यांचे पती ऑफिसमध्ये असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी ग्रुपमधुन मला का काढून टाकल असे विचारणा केली. त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मॅसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचं सांगितलं, यावरुन संतापलेल्या पाच जणांनी तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर मारहाण केल्याने तक्रारदारांची जीभ कापली गेली आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हात तोडल्याची घटना
त्याआधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला होता. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. दारुच्या नशेत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना हॅपी न्यू इयर (Happy New Year) म्हणत काही तरुण धिंगाणा घालत होते. यावेळी झालेल्या वादातून चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याचा हात मनगटापासून तोडला.