पुणे : Pune Crime : रुबी हॉस्पिटलमधील पुणे किडनी रॅकेटप्रकरणी (Pune Kidney racket case) धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या एजंटनीही स्वत:ची किडनी विकल्याचं उघड झाले आहे. इतकंच नाही तर आणखी दोघांना खोटे नातेवाईक दाखवून किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरेगाव पार्क पोलिसांनी रवींद्र रोडगे आणि अभिजित गटने या दोघांना अटक केली आहे. (2 arrested by Pune police in connection with kidney racket case) त्यांनी सहा वर्षांपूर्वी बदलापूर इथल्या एका डॉक्टरांच्या वडिलांना आणि पंढरपुरातील एकाला किडनी मिळवून दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. त्यामुळे या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आला आहे.


रुबी हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया बंद ठेवणार?


बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणानंतर हॉस्पिटलमधील सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचा इशारा रुबी हॉल क्लिनिकने दिला आ हे. पुण्यातील बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणाशी रुबी हॉस्पिटलचा कुठलाच संबंध नसताना हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. 


कागदपत्रांच्या पडताळणीशी काहीही संबंध नाही. शस्त्रक्रिया नीट पार पडणे तसेच रुग्णाची प्रकृती सुरक्षित राहणे इतकीच हॉस्पिटल आणि डॉक्टरांची जवाबदारी आहे. या प्रकरणात ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली गेली, असे असताना हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली, असे हॉस्पिटलचे म्हणणे आहे.


या संपूर्ण पार्श्वभूमीवर येत्या काळात हॉस्पिटलमधील सर्व प्रकारच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. जोपर्यंत याबाबतच्या कायद्यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबवणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन त्याचप्रमाणे नेफ्रोलॉजिस्ट असोसिएशन यांनी देखील रुबीवरील कारवाईचा निषेध केला आहे.