नागपूर : नव्या वर्षातही नागपुरात हत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. नागपुरात काल रात्रीही दोन हत्या झाल्या. या घटनानंतर परिसरात भीतिचं वातावरण आहे. या दोन्ही हत्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिंगाबाई टाकळी परिसरात आनंद खरे नावाच्या व्यक्तिची मराठी शाळेजवळ भोसकून हत्या करण्यात आली. मद्यपान केल्यानंतर झालेल्या भांडणार ही हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत सावनेर भागात अंगद सिंह या जिम संचालकाची भोसकून हत्या करण्यात आली. ऑक्सिजन या जिमचा संचालक असलेल्या अंगदसिंगवर रात्री ९ वाजता हल्ला करण्यात आला. अंगद सिंग हा राज्याचे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा कार्यकर्ता आहे. अनेकवेळा तो त्यांच्यासोबत दिसायचा. 


हत्यांच सत्र सुरूच आहे. 4 तारखेपासून हे हत्यासत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत आठ हत्या झाल्या आहेत. गेल्या 12 दिवसांमध्ये झालेल्या या हत्यासत्रामुळे नागपुरात कायदा, सुव्यवस्थेचा काय प्रश्न आहे हे स्पष्ट होत आहे. यामधील काही हत्या शहरात तर काही हत्या ग्रामीण भागात झाल्या आहेत. नागपुर जिल्ह्यात घडलेल्या या हत्यासत्रानंतर सामान्य नागरिक हादरले आहेत. 


तसेच महाविकासआघाडी सरकारचे गृहमंत्रीपद नागपुरात आले तरीही हत्यांचे सत्र हे सुरूच आहे. शहरातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी अन्यथा गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नष्ट होईल, असं देखील म्हटलं जात आहे.