नाशिक : धक्कादायक बातमी नाशिकमधून. रमजान सणानिमित्ताने माहेरी आलेल्या नवविवाहितेची तिच्याच मामीने दीड लाखात विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. पीडितेवर खरेदीदाराने तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, मामीने तिची विक्री करत तिचा ७ जूनला दुसरा विवाह करून टाकला. पीडित महिलेला तुझे पती अजमेरला आलेले आहेत, असे सांगत तिला मध्यप्रदेशात घेऊन गेले. तिची फसवणूक झाल्याचे नंतर लक्षात आले. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. नाशिक पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये सख्ख्या मामीनेच भाचीची दीड लाखांत विक्री केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वडाला गावात राहणार्‍या नवविवाहितेला अजमेरला दर्शनासाठी जाण्याचे बहाणा करत तिच्या मामीने तिची विक्री केली. एवढ्यावर ती न थांबता तिचा ७ जूनला दूसरा विवाह करून टाकला. पीडित महिलेला तुझे पती अजमेरला आलेले आहे असे सांगत तिला मध्यप्रदेशात घेऊन गेले. हा सगळा प्रकार पीडितेच्या लक्षातच आला नाही. 



दुसरे लग्न मामी लावून देतेय म्हणून विरोध सुरु केला. मात्र तिथे सार काही वेगळच घडू लागले. तिथे गेल्यावर तिच्यावर संशयीत खरेदीदार आणि त्याचे साथीदार मानसिक छळ करू लागले. इतकेच नव्हे तर शारीरिक अत्याचार केलेत. पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काहीही होत नव्हते. कसाबसा आपल्या मामाशी फोनद्वारे संपर्क केला होता. सगळा प्रकार पीडितेने मामाला सांगितला आणि मामाणे पोलिसांत धाव घेत इंदिरानगर पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्याच आधारावर नाशिक पोलिसांनी पीडितेचा शोध सुरू केला. मोबाइल लोकेशननुसार नाशिक पोलिस घटनास्थळी पोहोचत पीडितेची संशयितांच्या ताब्यातून सुटका केली. 


याबाबत नाशिक पोलिसांनी पीडितेच्या मामीचा शोध घेत तिला अटक केली आहे. मामीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित चेत्या ऊर्फ शाहरुख, पीडितेची खरेदी करणारा संशयित हेमंत धाकड, परविण ऊर्फ राणी आणि पीडितेची मामी यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधऱी यांनी दिली. 


दरम्यान गोरगरिब कुटुंबाला मोठ्या रकमेचे आमिष दाखवून त्यांच्या मुलींची थेट विक्री करण्याचे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी देखील याच परिसरातील दोन ते तीन मुलींची विक्रीच्या घटना घडल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांसमोर अशा रॅकेटचा पर्दाफाश करत पाळेमुळे उखडून फेकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.