अंबरनाथ : Building Lift Collapses at Ambernath : धक्कादायक बातमी. अंबरनाथमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. या अपघातात सात महिला जखमी झाल्या. त्यामधल्या दोघींचे पाय मोडलेत. अंबरनाथच्या निलयोग नगर परिसरातल्या अनिता बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडलीय. या इमारतीत काही महिला डान्स प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून परतत असताना लिफ्ट खाली कोसळली. दोन महिलांचे पाय जागीच मोडले. ओव्हरलोड झाल्याने लिफ्ट कोसळल्याची माहिती मिळत आहे.


लिफ्ट दुसऱ्या माळ्यावरून कोसळली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट दुसऱ्या माळ्यावरुन कोसळल्याने दुर्घटना घडली. या घटनेत लिफ्टमधील सात महिला जखमी झाल्या असून दोघींच्या पायाला गंभीर स्वरुपाची इजा झाली. निलयोग नगर परिसरात अनिता बिल्डिंग आहे. ता इमारतीत सोमवारी काही महिला दुसऱ्या मजल्यावरील एका घरी डान्सच्या प्रॅक्टिससाठी गेल्या होत्या. तिथून सायंकाळी पाचच्या दरम्यान परतत असताना लिफ्टमध्ये सात महिला शिरल्या. यावेळी लिफ्ट अतिशय वेगात खाली येऊन कोसळली. 



कोसळणाऱ्या लिफ्टचा वेग इतका जास्त होता, की दोन महिलांचे पाय जागीच मोडले. तर इतर महिलांनाही किरकोळ इजा झाल्या. या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतल्या रहिवाशांनी तिथे धाव घेत त्यांना बाहेर काढले. त्यानंत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.


दरम्यान, याबाबत या इमारतीचे विकासक ज्ञानधर मिश्रा यांना विचारले असता, ही इमारत अतिशय नवीन असून लिफ्ट खराब होण्याचे काही कारण नव्हते. मात्र लिफ्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त महिला शिरल्याने लिफ्ट कोसळल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत या सोसायटीतील सदस्यांनी यापूर्वीही दोन वेळा समज दिली होती. मात्र तरीही क्षमतेपेक्षा जास्त लोक एकाच वेळी लिफ्टमध्ये गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. तसेच ही इमारत आपण सोसायटीला हँडओव्हर केलेली आहे. सोसायटीकडून लिफ्टचे मेंटेनन्स सुद्धा केले जात असल्याची माहिती इमारतीचे विकासक ज्ञानधर मिश्रा यांनी दिली.