बुलढाणा : डॉक्टरांच्या चुकीमुळे एका गर्भवती महिलेला प्राणाला मुकावं लागल आहे. सिझेरिअन करताना महिलेच्या पोटात कापसाचा बोळा राहिला. त्यामुळे महिलेचा जीव गेला. बुलढाणा जिल्ह्यात कवठळ इथे हा प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. डॉक्टरांची एक चूक रूग्णाच्या जीवावर बेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा पाखरे या महिलेची खामगावच्या सामान्य रूग्णालयात ७ एप्रिलला प्रसुती झाली. मात्र पुजाचं पोट दुखत असल्याने तिला ११ एप्रिलला अकोल्यात दाखल करण्यात आलं. १० जूनला तिच्यावर खामगावच्या डॉ. अरविंद पाटील यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता पोटात बँडेजच्या पट्टीचा बोळा आढळळा. त्यामुळे तिच्या पोटात इन्फेक्शन होऊन वेदना वाढल्या होत्या.


मोताळाचे  डॉक्टर शरद काळे यांनी ऑपरेशन करून हा बोळा बाहेर काढला. मात्र तिची झुंज अपयशी ठरली आणि तिने जगाचा निरोप घेतला. खामगावच्या सामान्य रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेलाच पण एक बाळही आईविना पोरकं झालं. या घटनेनंतर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.


महिलेच्या प्रसूती दरम्यान सिझेरिअन करताना डॉक्टरांची चूक महागात पडली.  प्रसूती करताना महिलेच्या पोटातच कापसाचा बोळा राहिला. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे सगळीकडून टीका होत आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाला असून अवघ्या 16 दिवसांचं बाळ पोरकं झालं आहे.  बुलढाणा जिल्ह्यातल्या कवठळमधली ही अतिशय धक्कादायक घटना आहे.