संतापजनक! डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके
शासकीय रुग्नलायाच्या कमानीबाहेरील संतापजनक प्रकार
नांदेड : एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे डुकरं (वराह) लचके तोडत असल्याच्या धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील विष्णुपुरी येथील (The pigs broke the limbs of the unidentified human death body) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेरील ही धक्कादायक घटना आहे. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला होता.
आज सकाळी या मृतदेहाला डुकरं खात असल्याचा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. डुकारांना नागिरकानी हाकलून लावले पण तोपर्यंत डुकरानी अर्धाधिक मृतदेह खाल्ला होता. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण, मनोरुग्न, भिकारी पडून असतात. त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडल्याने नागरिकातुन संताप व्यक्त केला जात आहे.
हा मृतदेह साधारणतः दोन ते तीन दिवसांपूर्वी परिसरात पडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय व्यवस्थापनावर नागरिकांचा रोष वाढला आहे.
एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे लचके तोडताना डुकर दिसत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या भावना बोथट झाल्या की काय असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन रुग्ण आणि मृत व्यक्तीबद्दल किती गंभीर आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.