Toll Plaza In Maharashtra : टोल असावा की नसावा याबद्दल नेहमीच चर्चा होत असते.. राज्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर आपल्याला टोल भरावा लागतो.. त्यामुळे खरंच टोल किती गरजेचा असा प्रश्न उपस्थित केला जातोय.. उदाहरणच पाहायचं झालं तर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचं पाहू... या महामार्गावर आपल्या टोल भरावा लागतो खरा, पण आपला प्रवास जलद व्हायलाही मदत होते.. टोलमधून रस्त्याची डागडुजी वेळेवर केली जाते.. त्यामुळे चांगल्या रस्त्यासाठी टोल गरजेचा आहेच, हे स्पष्ट होतं...
टोल टॅक्सबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांबाबत झी मीडियाने एक मोहीम सुरू केलीय... यासाठी आपण मुंबईतील एक उदाहरण पाहणार आहोत. मुंबईमध्ये होणारं ट्रॅफीक जॅम आपल्याला माहितच आहे.. त्यामुळे मुंबईकर नेहमीच हैराण असतात.. त्यांना आता यापासून दिलासा मिळालाय तो अटल सेतूमुळे.


टोल किती गरजेचा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सीएसएमटी ते जेएनपीटी नवी मुंबई अंतर -  50 ते 55 किमी 
- सीएसएमटी - जेएनपीटीसाठी दोन रस्त्यांचा पर्याय उपलब्ध आहे
- एक रस्ता वाशी मार्गे,  टोल आहे 45 रुपये 
- वाशीमार्गे प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे  दीड ते दोन तासांचा वेळ लागतो
- दुसरा रस्ता आहे अटल सेतू, टोल आहे 250 रुपये
- अटल सेतूमार्गे 35 ते 45 मिनिटांमध्ये प्रवास होतो.. ट्रॅफिकच्या संकटातून सुटका होते


टोल भरल्यानं प्रवासाच्या वेळेची बचत होते.. वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होते.. चांगल्या रस्त्यांसाठी टोल भरायला कुणाचीही ना नसते.. कधी तरी आपल्याला टोलच्या रक्कमेचा भुर्दंड वाटत असला तरी वेळेची बचत होऊन त्याची परतफेड होतच असते... त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं..त्यामुळे खऱ्या अर्थाने TIME IS MONEY ही म्हण सार्थकी लागते.