सोनू भिडे, नाशिक- अमरनाथ येथील गुहेत बर्फाची महादेवाची पिंड तयार झाली आहे. याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक अमरनाथ यात्रा करत असतात. हि यात्रा गुरुवारी (३० जून) सुरु झालीय. मात्र याच (गुरुवार) दिवशी नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथील आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील त्रिपिंडी भोवती सुद्धा बर्फाचा शिळा जमा झाला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्यान आचार्य व्यक्त केल जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराच दर्शन घेण्यासाठी भारतातून भाविक येत असतात. या मंदिरातील पिंडीत ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे त्रीगुणाक प्रतीके आहेत अस म्हटलं जात. गुरुवारी (३० जून) पहाटे चार वाजता पुजारी सुशांत तुंगार मंदिर गर्भगृह उघडण्यास गेले होते. महादेवाची त्रिपिंडीची स्वच्छता करत होते. त्रिपिंडी वरील बेल पान काढत असताना त्यांना शिवपिंडीवर बर्फाची शिळा आढळून आल्याचा दावा त्यांनी केलाय. हि बर्फाची शिळा त्यांनी बाहेर काढली. याचे व्हिडीओ शुटींग त्यांनी त्यांच्या सहकर्याला करायला सांगितलं. बर्फाची शिळा काढली त्यावेळी गर्भगृहात वातावरण थंड होत तसेच त्यांचे अंग सुद्धा थंड झाले होते असा दावा तुंगार यांनी केला आहे. 


तज्ञांचे मत
काही महिन्यांपुर्वी गणपती पाणी पीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचा शोध घेतला असता याला शास्त्रीय कारण समोर आल होत. शिवपिंडीवर बर्फाचा थर जमणे या घटनेलाही शास्त्रीय कारण असावे असे मत तज्ञांनी व्यक्त केलंय. वातावरणात अचानक होणारा बदल यामुळे पिंडीवर बर्फ जमू शकतो. मंदिरातील तापमान आणि मंदिराच्या बाहेरील तापमान यात बरीच तफावत असते. बाहेरील तापमानापेक्षा आतील तापमान हे १२ ते १३ अंशांनी कमी असते. यामुळे पिंडीवर बर्फ जमा झाला असल्याची श्यक्यता नाकारता येत नाही. 


अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आवाहन 
यात कोणताही दैवी चमत्कार किंवा चागले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाही. नैसर्गिक घटनांमागील कार्यकारणभाव समजून घेण्याची तसदी आपण घेत नाही. ज्यांना चमत्काराच्या माध्यमातून समाजात दैववाद पसरवायचा असतो. यातून स्वतःचे आर्थिक हितसंबध वाढवायचे असतात तेच लॉक अशा अफवा जाणीव पूर्वक पसरवत असतात. म्हणून लोकांनी अशा अफवांवर अजिबात लक्ष ठेव नये असे आवाहन अनिस कडून करण्यात आले आहे. 


मंदिराच्या गर्भगृहात काही दिवसांपासून विरळ बर्फ जमा होत असल्याचे जाणवत होते. या अगोदर शिवपिंडीतून उष्मा बाहेर पडणे, आवाज येणे, पाण्यात बुडबुडे येणे, मुंग्याच वारूळ अश्या घटना घडल्या आहेत. मात्र, अशा प्रकारे पिंडीवर बर्फाचा जाड थर प्रथमच बघायला मिळाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे बर्फ नैसर्गिक रित्या जमा झाला कि कोणी अज्ञात व्यक्तीने तो आणून ठेवला याचा शोध घेतला जात आहे.