पुणे  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 'कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस' (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.  श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या आहे. श्रुतीने पुण्यातच लॉचे शिक्षण घेतले आहे.


सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिली आली आहे.