...इथं नागरिकांनी नरकासुराची भर बाजारात काढली धिंड
नरकासूर दहन पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात आज भल्या पहाटे दिवाळीची धूम पहायला मिळतेय. आज पहाटे सणानिमित्ताने पारंपारिक नरकासूर दहनाची स्पर्धा रंगली. मालवण समुद्र किनारी आणि सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर दरवर्षी नरकासुर दहन केले जाते.
यावर्षी रात्रभर अनेक होशी मंडळांनी नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्यांची भर बाजारपेठेतून वाजत गाजत धिंड काढली.
मालवणमध्ये नरकासूर बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सुमारे २५ नरकासुर सहभागी झाले. नरकासूर दहन पहाण्यासाठी मालवण समुद्र किनाऱ्यावर सकाळी गर्दी लोटली.
नरकासूर दहनाचा हा कर्यक्रम पहाटे चार वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता.